Cheapest electric car in india | How to buy cheapest electric car in India | Electric car Prices in India

 Cheapest Electric Cars in India :

भारतात मिळणाऱ्या काही अत्यंत कमी किमतीच्या इलेक्ट्रिक कार, या इलेक्ट्रिक कारचे features यांच्यामध्ये अत्यंत खास आहेत. इलेक्ट्रिक कार ची किंमत ४.५ लाख असल्यामुळे या कारला ग्राहकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चला तर मग आपण या इलेक्ट्रिक कार चे features आणि अजून काही गोष्टी माहित करून घेऊयात.

भारतीय बाजारात अनेक अश्या ऑटोमोबाईल कंपन्या आल्या आहेत. या सर्व कंपन्या भारतात अनेक अश्या गाड्या उतरवत आहेत. सध्याच्या काळात डिझेल आणि पेट्रोल चे भाव पाहता या इलेक्ट्रिक गाड्या ग्राहकांना खूप आवडत आहेत. तसेच या इलेक्ट्रिक गाड्या ग्राहकांच्या बजेट मध्ये असल्यामुळे यांना सर्वसामान्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

पण आपण आज ज्या कंपनी बद्दल बोलत आहोत ती म्हणजे Storm Motors हि कंपनी भारतीय बाजारात लवकरच ४.५ लाखांपर्यंत यांची नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. या कार चे नाव storm R३ असणार आहे हि इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेमधील सर्वात स्वस्त कार आहे. 

Storm R३ हि एक ३ व्हिलर कार आहे. कार मध्ये आपल्याला २ दरवाजे आणि २ comfortable सीट्स पाहायला मिळतील. कार मध्ये आपल्याला मोठा सनरूफ देखील पाहायला मिळेल. 

 

बुकिंग प्रोसेस :

हि इलेक्ट्रिक कार आपण फक्त १०,००० रुपये देऊन बुक करू शकता . या कार ची बुकिंग यांच्या अधिकृत साईट www.strommotors.com वर चालू आहे. 

 

 

Features :

या कार मध्ये कंपनीने लिथियम आयन बॅटरी चा उपयोग केला आहे . तर या इलेक्ट्रिक कार च्या बॅटरी ला ३ वर्ष्यांची वॉरेंटी मिळणार आहे. त्यामुळे कार घेतल्यावर आपण तीन वर्ष नो टेन्शन राहू शकता. आपण हि कार एकदा चार्जे केल्या वर सुमारे २०० किमी चा पल्ला आरामात पार करू शकते.

तर हि इलेक्ट्रिक कार आपल्याला ०.४० मध्ये आपल्याला १ किमी नेऊ शकते. तसेच या इलेक्ट्रिक कार मध्ये टच स्क्रीन वापरली आहे. या कार चे वजन ५५० किलो आहे या कार मध्ये आपल्याला ४०० लिटर चा बूट स्पेस पाहायला मिळेल या इलेक्ट्रिक कार मध्ये आपल्याला ऑनबोर्ड चार्जर देखील पाहायला मिळेल. अपेक्षा आहे कि हि कंपनी टेस्ला तसेच अनेक अशा विदेशी ऑटोमोबाईल कंपनीला मागे टाकू शकेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*